शालेय कबड्डी स्पर्धेत टोपीवाला, भंडारी हायस्कूल विजेता
मालवण आस्था ग्रुपच्या वतीने तालुकास्तरीय मुले, मुली गटात स्पर्धा संपन्न
मालवण | प्रतिनिधी : आस्था ग्रुपच्या वतीने मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूल तर मुलींच्या गटात भंडारी हायस्कूलने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन टोपीवाला हायस्कूलचे कार्याध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, आस्था ग्रुप अध्यक्ष उमेश मांजरेकर, विजय कामत, अजय शिंदे, रेनॉल्ड भुतेलो, सागर नरे, सूर्यकांत फणसेकर, सौगंधराज बादेकर, अनिकेत फाटक, रवी मिटकर, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, रामभाऊ पेडणेकर, निनाद बादेकर, बंटी चव्हाण, संग्राम कासले अविनाश मांजरेकर, पंकज गावडे, मिथिलेश मिठबावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सतरा वर्षाखालील मुलगे मुली अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ओझर हायस्कूल, देवबाग हायस्कूल, भंडारी हायस्कूल, काळसे हायस्कूल, कन्याशाळा, टोपीवाला हायस्कूल, रेकोबा हायस्कूल, कुडाळकर हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल असे मुला मुलींचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेस क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुलांच्या गटातील अंतिम सामना काळसे हायस्कूल व टोपीवाला हायस्कूल यांच्यात झाला. यात टोपीवाला हायस्कूलच्या संघाने काळसे हायस्कूलचा पराभव करत विजेतेपद पटकावले. काळसे हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात भंडारी हायस्कूल व टोपीवाला हायस्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. यात भंडारी हायस्कूलच्या कबड्डीपटुनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवीत टोपीवाला हायस्कूल संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. टोपीवाला हायस्कूल संघास उपविजेतेपद मिळाले.
स्पर्धेत पंच म्हणून रामभाऊ पेडणेकर, उत्तम पेडणेकर, रेनॉल्ड भुतेलो, जतीन कांबळी, जेरी फर्नांडिस, गौरव सांडव, मंदार ओरसकर, नितीन हडकर, विकी नेवाळे, बंटी मांजरेकर, हरिश्चंद्र साळुंखे यांनी तर गुणलेखक म्हणून पंकज गावडे, रिद्धी हडकर, दिनेश चव्हाण, यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन निनाद बादेकर, शुभम लुडबे, श्रीराज बादेकर, अवि मांजरेकर, युवक क्रीडा मंडळ महापुरुष रेवतळेचे खेळाडू यांनी केले होते.
स्पर्धेत मुलांच्या गटात उत्कृष्ट चढाई विघ्नेश धामापूरकर (काळसे हायस्कूल), उत्कृष्ट पकड उत्कर्ष मांजरेकर (टोपीवाला हायस्कूल), अष्टपैलू खेळाडू शुभम नेरुरकर (काळसे हायस्कूल) तर मुलींच्या गटात उत्कृष्ट चढाई पूर्वा बांदकर (भंडारी हायस्कूल), उत्कृष्ट पकड रिया ढोलम (टोपीवाला हायस्कूल), अष्टपैलू खेळाडू श्रुतिका चव्हाण (भंडारी हायस्कूल यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास छत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ, श्री. पावसकर, आस्था ग्रुप अध्यक्ष उमेश मांजरेकर, विद्याधर केनवडेकर, प्रशांत हिंदळेकर, मनोज चव्हाण, रवी मिटकर, सौगंधराज बादेकर, नितीन हडकर, श्री. साळुंखे आदी उपस्थित होते.
फोटो – आस्था ग्रुपच्या वतीने टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (अमित खोत, मालवण)












