लांजा (प्रतिनिधी) निसर्गातील विविध कीटक तसेच मुंगी यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन शिबीर आणि चर्चासत्र नुकतेच न्यू इंग्लिश स्कूल व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी मित्रकिडा बायो सोलूशन्स प्रा.ली.चे कीटकशास्त्रज्ञ डॉ.राहुल मराठे तसेच बायोलॉजिस्ट व शास्त्रज्ञ श्रीम.नूतन कर्णिक उपस्थित होते.हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल व तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा व स्वराज ॲग्रो सर्व्हिसेस लांजाचे अजिंक्य पुरात यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्याना अतिशय चांगल्या प्रकारे मानवी जीवनातील कीटक व मुंगी यांचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय हटकर यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लांजा महाविद्यालयातील प्राध्यापक श्री.पाटोळे व पर्यवेक्षक श्री.सोनवले यांनी केले.











