सिंधुनगरी : प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी जाहीर केले आहेत. जिल्ह्यातून आलेल्या एकूण 19 शिक्षकांच्या प्रस्तावातून प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे आठ आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
देवगड मधून जि प शाळा सौंदळे बाऊळवाडीचे उपशिक्षक दीपक तानाजी डवर, दोडामार्ग मधून जि प शाळा झोळंबे चे उपशिक्षक संतोष ज्ञानेश्वर गवस, कणकवली मधून जि प शाळा घोणसरी नंबर 5 चे उपशिक्षक विद्याधर पांडुरंग पाटील, कुडाळ मधून जि प शाळा अणाव दाबाचीवाडी चे पदवीधर शिक्षक पंढरीनाथ अनंत तेंडोलकर, मालवण मधून धामापूर बौद्धवाडी शाळेचे उपशिक्षक दीपक केशव गोसावी, सावंतवाडी मधून माडखोल नंबर दोन चे उपशिक्षक अरविंद नारायण सरनोबत, वैभववाडी मधून बालभवन विद्यामंदिर मौदे चे उपशिक्षक संतोष यशवंत मोहिते, व वेंगुर्ला मधून केंद्र शाळा वांयगणी सुरंगपाणी च्या उपशिक्षिका शामल शंकर मांजरेकर उर्फ पिळणकर यांना हे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
जिल्ह्यातून देवगड मधून दोन दोडामार्ग मधून एक कणकवली मधून दोन कुडाळ मधून पाच मालवण मधून चार सावंतवाडी मधून एक वैभववाडी मधून दोन वेंगुल्या मधून दोन असे 19 शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांच्या अध्यक्षतेखाली निवड कमिटीची बैठक होऊन हे पुरस्कार निवडण्यात आले होते. या पुरस्कार प्राप्त कोकण आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी जाहीर करण्यात आले. सिंधुदुर्ग चे प्रभारी शिक्षणाधिकारी श्री कुडाळकर व जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर याने या सर्व आदर्श शिक्षकांचे अभिनंदन केले असून जिल्ह्यातील शिक्षकांना मंगळवारी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.











