जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे माजी संचालक विजयकुमार मोहिते यांचे निधन

राजापूर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी संचालक व राजापूर तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील हवालदार (नाईक) विजयकुमार शंकर मोहिते (59) यांचे रविवारी 3 सप्टेंबर रोजी मुंबईत आकस्मिक निधन झाले. विजयकुमार मोहिते यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेवर दहा वर्षे संचालक म्हणून काम केले. या कार्यकाळात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय दिला. तर अन्य विविध संस्थांवरही ते कार्यरत होते. नोकरीबरोबरच सामाजिक कार्याची आवड असलेल्या मोहिते यांचा राजापूर तसेच रत्नागिरीतील विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग असे. एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.
रविवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या मुलांनी त्यांना तात्काळ उपचारासाठीही दाखल केले. मात्र त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहीत मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.