राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका जनकल्याण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पतसंस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिवगण यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी सभासदांना ११ टक्के लांभाश देण्याला मंजूरी देण्यात आली.राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरमध्ये पार पडलेल्या या सभेत अल्पावधित भरारी घेतलेल्या या पतसंस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे सभासदांमधून अभिनंदन करण्यात आले. पतसंस्थेचा विस्तार हा सद्या तालुका मर्यादित असल्याने उर्वरित गावांना सामाविष्ठ करण्यात यावे. पाचल, केळवली, ओणी, नाटे, जैतापूर, आडिवरे येथे शाखा उघडण्यात यावी, याकरीता स्वमालकीची जागा घेणेत यावी असे ठराव पारीत करण्यात याले. तर लवकरच ओणी येथे शाखा उघडण्यात येणार असल्याची माहीती चेअरमन हरिश्चंद्र शिवगण यांनी दिली.
अल्पावधीतच जनकल्याण पतसंस्थेने घेतलेली भरारी ही सभासद, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे असे सांगून चेअरमन श्री. शिवगण यांनी सर्वाचे आभार मानले.यावेळी मोहन पाडावे, प्रकाश कातकर, संतोष हातणकर, प्रकाश शिंदे, सुभाष नवाळे, प्रभाकर हातणकर, नामदेव नागरेकर, प्रकाश पुजारी, दिलीप नलावडे आदीनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. प्रास्ताविक व्यवस्थापक प्रकाश हातणकर यांनी सुत्रसंचालन गणेश गोंडाळ यांनी तर आभार सौ.दिया नलावडे यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.











