भाजपात प्रवेश केलेले दिगवळेचे सरपंच संतोष घाडीगांवकर यांना धमकी!

प्रथमेश सावंत यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हे दाखल!

कणकवली : दिगवळे गावचे सरपंच संतोष घाडीगांवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रथमेश मोहनराव सावंत सह अन्य तिघांनी ‘तू पक्ष का सोडलास ?’ असा जाब विचारून त्यांना गावात गावाच्याबाहेर फिरू देणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत कणकवली पोलिसात संतोष घाडीगांवकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी प्रथमेश मोहनराव सावंत, मुकेश सुनिल सावंत (रा. नाटळ ) तुषार गावकर (रा. कनेडी) व अन्य एकावर भादंवी ३४१, ५०६, ३४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी १.४५ वा. च्या सुमारास संतोष घाडीगांवकर (रा. दिगवळे) हे मोटारसायकलवरुन (एमएच ०७ एन ९६६) घरी जात असताना हरकुळ बुद्रुक येथील मराठे दवाखाना बस स्टॉपजवळ पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना ओव्हरटेक केली व कार आडवी उभी करून घाडीगांवकर यांची मोटरसायकल अडविली. कारमधून प्रथमेश सावंत व अन्य तिघेही कारमधून उतरले. प्रथमेश सावंत यांनी त्याला ‘तू कोणाला विचारून पक्ष सोडलाय असे वचारत त्याने सतिश सावंत यांना फोन लावला. यावेळी संतोष रामकृष्ण घाडीगांवकर यांनी त्यांना प्रथमेश सावंत यांचे पटत नसल्याने आपण पक्ष सोडल्याचे सांगितले. त्यावेळी संतोष घाडीगांवकर यांना तु गावात व गावाबाहेर फिरायच नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद दाखल केली आहे.