ह. भ. प. शरद दादा बोरकर यांचे कार्य कायमस्वरूपी सुरू राहावे : डॉ. कांबळे

Google search engine
Google search engine

ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा

ह. भ. प. शरद दादा बोरकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण व सन्मान सोहळा संपन्न

खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे जाणकार ह. भ. प. शरद दादा बोरकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह अनेक क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे कार्य केले होते. या कार्याचा वसा आणि वारसा ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे यांनी अविरतपणे सुरू ठेवावे अशी अपेक्षा डॉ. अनिल कुमार कांबळे यांनी व्यक्त केली.ते ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांच्या वतीने शरद दादा बोरकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी यावेळी मागील अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या भिकाजी गणपत तथा नानासाहेब विचारे यांना ह. भ. प. शरद दादा बोरकर जीवनगौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान, वरवडे यांच्यावतीने नुकताच विविध स्पर्धातील बक्षीस वितरण समारंभ आणि सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात अविरतपणे मागील अनेक वर्ष कार्य करत असलेल्या लोकांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, आपण सर्वांनीच शरद दादा बोरकर यांनी चालविलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सागरी पोलीस ठाणे जयगडचे जयदीप कळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना समाजामध्ये कार्य करत असताना आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्या क्षेत्राला न्याय देऊन त्या – त्या संबंधित क्षेत्रामध्ये सर्वांनीच अतुलनीय कार्य केल्यास समाजाकडून आपला नक्कीच गौरव होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे आवाहन केले.
यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राजन बोडेकर यांनीही ह. भ. प. शरद दादा बोरकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आणि ह. भ. प. शरद दादा बोरकर यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमाची यावेळी माहिती दिली.

या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्तात्रय कदम यांनी दादा बोरकरांच्या कार्यामधील वेगळेपण आणि त्यांच्यातील महत्त्वाचे गुण सांगत असताना दादा बोरकर जरी आपल्यातून शरीराने निघून गेले असले तरीही ते मनाने विचाराने स्मृतीने आपल्या सोबत कायम असल्याचा भास होतो. त्यामुळे ज्या तळमळीने शरद दादा बोरकर यांनी ग्रामीण भागामध्ये कार्य केले, ते कार्य पुढे चालू राहणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी व लोकोपयोगी उपक्रम राबवावेत आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी राहू असेही सांगितले.तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर त्याचा आबा पाटील यांनीही शुभेच्छा देत आयोजित केलेला आहे हा सन्मान सोहळा नक्कीच कौतुकाचा आहे. ज्याप्रमाणे दादांनी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रेरित केले, त्यामुळे सर्वांनाच शरद दादा बोरकर यांच्या प्रति कायम आदर राहिलेला आहे. त्यामुळे भविष्यात कवी केशवसुत स्मारक नेहमीच या प्रतिष्ठानच्या सोबत असेल.

कार्यक्रमाचे सुरुवातीला शरद दादा बोरकर यांच्या कार्याबद्दल माहिती प्रतिष्ठानचे अरुण मोर्ये यांनी दिली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे निखिल बोरकर यांनी करून भविष्यातही या सन्मान सोहळ्यासह अनेक कार्यक्रम राबविण्याचा मानस असून त्यामध्ये शिक्षण, आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रमांची राबविण्याची आमची इच्छा असून सर्वानी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पुरस्कार विजेत्या पुरस्कारार्थीनीही आपले मनोगत व्यक्त करत दादांच्याप्रति संवेदना जपत प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे, नारायण बोरकर, अशोकराव विचारे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत गुरव,शेखर भडसावळे, बावीस खेडी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रजत पवार, वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुधाकर शिर्के, नांदीवडे सरपंच आर्या गडदे, चाफेरी सरपंच अंजली कांबळे, मुख्याध्यापक जयवंत देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार विजेते, स्पर्धा विजेते व मोठ्या प्रमाणात शरद दादा बोरकर यांच्या प्रति आदर असणारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर बोरकर, सुदेश महाकाळ, निखिल बोरकर, निनाद चव्हाण, संदेश महाकाळ, सुयोग बोरकर, अरुण मोर्ये, विश्वनाथ शिर्के, प्रणय बोरकर, भालचंद्र कोकरे आणि माधव अंकलगे यांनी विशेष प्रयत्न केले. तर संपूर्ण कार्यक्रमासाठी वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.