सावंतवाडी शहरातील विकास कामे तातडीने मंजूर करा

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर परिमल नाईक व उदय नाईक यांचे निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती सुधीर आडवेकर उदय नाईक व ॲड. परिमल नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री ना. चव्हाण यांना सुपूर्द केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी शहराच्या सर्वागिण विकासाकरीता व समाजभिमुख पायाभुत सुविधा तातडीने पुर्णत्वास नेण्याकरीता खालील कामांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यात
सावंतवाडी शहरातील मोती तलाव हे सावंतवाडी संस्थान कालापासुन शहराच्या सौदर्यांमध्ये भर घालणारा एक दागीना समजला जातो व सदर तलावाचा काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. आगामी काळात विविध सण समारंभ पारंपारीक पद्धतीने नागरीकांकडुन साजरे होणार आहेत सबब सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन तातडीने मुबलक निधी मंजुर करून पडझड झालेला तलावाचा भाग जलद गतीने कामकाज पुर्ण करण्याविषयी संबंधीत खात्याला आदेश देण्यात यावा.
सावंतवाडी शहरात भुमीगत गटार योजना आराखडा तयार करण्यात आलेला असुन अस्तित्वात असलेली गटार पद्रधत ही फार जुनी व संस्थान काळा पासुनची आहे. शहरात झालेली अवाजवी लोकसंख्या वाढीमुळे शहरातील सांडपाणी हा एक गंभीर विषय झालेला आहे. सबब त्या करीता भुमीगत गटार योजने करीता आवश्यक तो निधी तातडीने मंजुर करण्यात यावी.
सावंतवाडी शहरात अस्तित्वात असलेली नळपाणी योजना ही फार जुनाट स्वरूपाची आहे व मागील तिन वर्षांपुर्वी सुमारे 46 कोटीची योजना मंजुर करण्यात आलेली आहे परंतु कोव्हीड – 19 च्या संकटामुळे शासनाने नविन योजनेवर निधी खर्च करण्यावर बंदी घालण्यात आलेली होती. सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करण्याकरीता मुबलक साठा असुन जुनाट पाणी पुरवठा योजनेमुळे पुरेसे पाणी नागरीकांना उपलब्ध होत नाही. सबब सावंतवाडी शहरातकरीता मंजुर असलेल्या नळपाणी योजनेला तातडीने निधी मंजुर करून नळपाणी योजनेचे काम पुर्णत्वास नेण्याकरीता संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश पारीत करण्यात यावा.
तसेच सावंतवाडी शहरात विज खांब व त्यावरील तारांचे जाळे निर्माण झालेले आहे परिणामी विदयुत भारीत तारा तुटुन त्यांच्या स्पर्शाने शॉक लागुन जिवीत हानी झाल्याच्या घटना सर्वश्रृत आहेत. त्याच प्रमाणे सदर खांब व लोबत्या तारांमुळे विदयुत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार तर सातत्याने घडतातच परंतु शहर विद्रृपीकरणात अनावश्यकपणे भर पडते. सबब भुमीगत विदयुत भारीत योजना तातडीने मंजुर करण्यात यावी.
तर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात झालेला असुन बरेच ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरीकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. सबब त्यांच्या संस्थेत घट होण्याकरीता कुत्र्यांची नसबंधी अगर तत्यम स्वरूपाची उपयायोजना करण्यासाठी तातडीने निधी मंजुर करण्यात यावा.
तसेच सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे संस्थान काळापासुन अस्तित्वात असुन ते पुर्वी “चेंडुफळी” म्हणुन प्रचलित होते व सदर मैदानावर “जमनाबाई पॅव्हेलीयन” अस्तित्वात आहे. सदर पॅव्हेलीयन हे पुर्णपणे जीर्ण झालेले असुन अस्तित्वात असलेले वाद –विवाद व प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा निपटारा करण्याचे आदेश संबंधीतांना देऊन सुसज्ज पॅव्हीलीयन करीता तातडीने निधी मंजुर करावा.
सावंतवाडी शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल प्रस्तावीत असुन सदर हॉस्पीटला सुलभ जागेची व्यवस्था करून आत्याधुनिक आरोग्य सुविधा प्राप्त करण्याकरीता तसेच पुरेसा निधी मंजुर करून तातडीने काम मार्गी लागण्याकरीता तसेच निष्णात वैदयकिय अधिकाराऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याकरिता आवश्यक ते आदेश पारीत करण्यात यावे.
ही सर्व कामे समाजभिमुख पायाभुत सुविधांशी निगडीत असुन सामान्य नागरीकांच्या दैनंदीन जिवनाशी जोडलेली अतीशय जिव्हाळयाची कामे आहेत व सदर कामे तातडीने पुर्णत्वास आल्यास नागरीकांमध्ये समाधान प्राप्त होणार आहे सबब ती तातडीने मंजुर करून व आवश्यक निधी उपलब्ध करून पुर्णत्वास नेण्याविषयी आदेश पारीत करण्यात यावेत अशी मागणीही पालिकेचे माजी सभापती ॲड. परिमल ग. नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक व नासीर शेख यांनी केली आहे.