शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने वेर्लेतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : सहकाऱ्यासोबत शिकारीला गेला असताना गोळी लागून वेर्ले येथील सचिन मर्गज या २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शिप्रीयन डान्टस ( ३५, रा. कोलगाव ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून घटनेबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान मृत युवकाचा मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.