सावंतवाडीतील मटका जुगाराविरोधात संजू परब यांचा एल्गार

पालकमंत्र्यांची भेट घेत दिले निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरात जोरदार सुरू असलेल्या मटका व जुगाराविरोधात माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी एल्गार पुकारला असून हे अवैध धंदे त्वरीत बंद करण्याचे आदेश पोलीसांना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी शहरात वाढते अवैध जुगार अन् मटका धंदा पाहता टपरी धारकांवर कारवाई न करता या संबंधीत कंपन्या मालकांवर थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अवैध मटका, जुगाराच्या आहारी जाऊन शालेय पिढी बरबाद होत आहे. याबाबत शाळांना भेट देणार असून या संदर्भात सावंतवाडीतील नागरिकांना घेऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली.