गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहर नियोजन बैठक संपन्न

 

मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहर नियोजन बैठक मालवण नगरपालिका येथे मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मालवण नगर परिषद सभागृह येथे संपन्न झाली.

यावेळी व्यापारी, विविध पक्ष पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक, खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते.

यावेळी मालवण नगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि उपस्थित यांना दिली. भाजी, फळे व अन्य विक्रेते बैठक व्यवस्था. पार्किंग व वाहतूक व्यवस्था. तसेच अन्य नियोजन, पोलीस बंदोबस्त याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिले. यावेळी महावितरण, बंदर, एसटी प्रशासन अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी बाळू अंधारी, सरदार ताजर, विश्वास गावकर, अवी सामंत, दादा वाघ, नंदकिशोर महाजन, महेश मयेकर तसेच अन्य उपस्थितानी काही सूचना मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडल्या. बंदर विभागाने त्यांच्या पार्किंग व्यवस्था ठिकाणी जागेत फळे भाजी विक्रेते यासाठी जागा मोकळी करून देण्याबाबत मुख्याधिकारी यांनी बंदर अधिकारी यांना सूचना दिल्या.