प्रेमदया प्रतिष्ठान चे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी 55, 555 रुपये बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देऊन
केला गौरव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठ्या रकमेच्या भव्य दहीहंडीचे प्रथमच कळसुली श्री स्वामी समर्थ मठ येथे आयोजन
कणकवली ( प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील कळसुली येथे गुरुवारी ७ संप्टेबर रोजी सायंकाळी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.गोविंदा रे गोपाळा, गोविंदा आला रे आला” अशा एकापेक्षा एक गाण्यांवर थिरकत ढोल पथकांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर नाचत रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात,दिमाखात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गोविंदानी थरावर थर लावत दहीहंडी उत्सव साजरा केला.
प्रेमदया प्रतिष्ठान( रजि) मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ (रजि) कळसुली यांच्या विद्यमाने कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या मैदानात दहीहंडी बांधण्यात आली होती.हि दहीहंडी निनादेवी गोविंदा पथक कणेरी- राजापूर च्या गोविंदा पथकाने फोडली.आणि 55,555 रुपये बक्षीसाचे मानकरी ठरले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठ्या रकमेच्या भव्य दिव्य अशा दहीहंडी चे प्रथमच आयोजन प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई (रजि) आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.
प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई (रजि) आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (रजि) चे अध्यक्ष हनुमंत सावंत यांच्या हस्ते निनादेवी गोविंदा पथक कणेरी- राजापूर यांना रोख रक्कम 55,555 रुपये, श्री .स्वामी समर्थांची प्रतिमा, सन्मानपत्र ,आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या मैदानात बांधलेल्या दहीहंडीचे प्रेमदया प्रतिष्ठान (रजि) मुंबई चे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील पाच दहीहंडी पथकांनी सहभागी होत थरावर थर लावत सलामी दिली.आणि बालगोपाळांची आणि उपस्थितांची मने जिंकली. गोविंदांचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
हनुमान प्रसन्न गोविंदा पथक खडपेवाडी- राजापूर , कुलस्वामिनी गोविंदा पथक कोळोशीची दोन गोविंदा पथके,निनादेवी गोविंदा पथक कणेरी- राजापूर, जय महाकाली गोविंदा पथक आडिवरे – राजापूर आदी पाच गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी व्यासपीठावर प्रेमदया प्रतिष्ठान( रजि ) मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली( रजि)चे अध्यक्ष श्री हनुमंत सावंत, उपाध्यक्ष संदीप पालकर अनिल हळदिवे कबड्डी असोसिएशन कार्यवाह कणकवली, नंदूशेठ टिकले,कल्पेश सुद्रिक ग्रा.पं.सदस्य,,दिलीप सावंत, शशिकांत दळवी, हेमंत वारंग,मंगेश भोगले, किरण सावंत ,ओमकार दळवी, राकेश पवार संतोष सावंत भाई पारधीये ,पंढरी जाधव आदी उपस्थित होते.
हनुमान प्रसन्न गोविंदा पथक खडपेवाडी- राजापूर , कुलस्वामिनी गोविंदा पथक कोळोशीची दोन गोविंदा पथके, जय महाकाली गोविंदा पथक आडिवरे – राजापूर या पथकानी थरावर थर लावत सलामी दिली.या सर्व गोविंदा पथकाना रोख रक्कम १५००० रुपये आणि श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी सन्मानित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना चांगले व्यासपीठ मिळावे , त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश समोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच कळसुली सारख्या ग्रामीण भागात प्रथमच ५५ हजार ५५५ रुपये बक्षिसाची भव्य दिव्य अशा मोठ्या रकमेची दहीहंडी बांधण्यात आली. गोविंदा पथकांना लागणारे सहकार्य करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोविंदा पथकानी पण दहीहंडी फोडण्यासाठी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा .असे आवाहन यावेळी बोलताना हनुमंत सावंत यांनी केले.या दहीहंडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फुर्त पणे नागरिकांचा प्रतिसाद मिळाला दहीहंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेमदया प्रतिष्ठान प्रतिष्ठान मुंबई (रजि)आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली (रजि) यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.यावेळी उपस्थित मान्यवर आणि गोविंदा पथकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्वामी समर्थांची प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी सन्मानित केले.












