मठ हायस्कूल येथील “गीत गायन” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद…

वेंगुर्ले : प्रतिनिधी :राय.डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ येथे गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळा मठ क्रमांक १,२,३ व मठ हायस्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसाठी गीत गायन केले होते.तसेच कु.श्रावणी धुरी या विद्यार्थिनीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.

श्री.पांडुरंग चिंदरकर सर, श्री. अतुल वाढोकर सर, सौ.चित्रा प्रभुखानोलकर मॅडम, सौ. अंजली माडये मॅडम, सौ.स्वप्नाली कांबळी मॅडम आणि मठ हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु.रश्मी सावंत यांनी भक्तिगीत, भावगीत तसेच मराठी व हिंदी चित्रपट गीत सादर करून विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. तसेच कार्यक्रमाची सुरुवात मठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यगीत म्हणून केली.

अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन फुले,शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्लेचे अध्यक्ष मा.जयप्रकाश चमणकर यांचे हस्ते डॉ.रामजी खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक संघ मुंबईचे मा.प्रकाशजी मटकर सर, मठ ग्राम पंचायतचे माजी सरपंच मा. तुळशीदास ठाकूर सर, प्राथमिक शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता पाडगावकर मॅडम, प्राथमिक शाळा क्रमांक ३ च्या मुख्याध्यापिका सौ. चित्रा खानोलकर मॅडम, मठ हायस्कूल मुख्याध्यापक श्री.एस ए.जाधव सर, मा.वीरधवल परब सर, माजी विद्यार्थी कु.रोशन गावडे, कु. गौरव मेस्त्री, कर्मचारी श्री. अनिकेत कांबळे, श्री. नरेंद्र नाईक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व शिक्षकांचा गौरव मा.जयप्रकाश चमणकर यांनी भेट वस्तू देवून केला.

कार्यक्रमाचे निवेदन श्री.जी. एम.गोसावी सर यांनी केले.तर आभार सौ.एस बी.कांबळी मॅडम यांनी मानले.