कसाल येथील संघ सेवक व इतिहास अभ्यासक प्रकाश भाऊ नारकर यांचे निधन.

सिंधुनगरी | प्रतिनिधी : कसाल बाजारपेठ येथील रहिवासी इतिहासाचे अभ्यासक ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्त्व प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकाश नारकर हे एक चालते बोलते इतिहास होते.सरांनी आपल्या या आयुष्य कालवधित खूप संस्थांवर काम केलं आहे.ते कसालं बाजारपेठेतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष,न्यू इंग्लिश स्कूल, कसाल चे निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक,कोंकण इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष,इतिहास संकलन समिती चे जिल्हा संयोजक, रां स्व संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा माजी प्रचार विभाग प्रमुख,नारुर येथील बालभैरव मंदिर निर्माते, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग ,अखिल भारतीय गिर्यारोहक संघटना जिल्हाध्यक्ष,शारदा ग्रंथालय,कसालचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक भूमिका ते यशस्वीपणे सांभाळत असत.

सरांच्या अशा अचानक जाण्याने कसालं दशक्रोशिसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.पूर्ण कसालं बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यांच्यावर कसाल येथील स्मशान भूमीत शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी रा. स्व.संघाचे प्रांत सह संघचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर,जिल्हा संघचालक रविकांत मराठे,आमदार वैभव नाईक,माजी आमदार राजन तेली,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना उद्धवगट जिल्हा प्रमुख संदेश पारकर,वैष्यसमाज जिल्हाध्यक्ष ऍड अंधारी,नारुर श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट तसेच कुडाळ तालुका खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली,सून,जावई,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे. कसाल बाजार पेठेतील नारकर हार्डवेअर चे ओमकार नारकर यांचे ते वडील तर नारकर मेडिकल चे राजू व रंजू नारकर यांचे ते काका होत.