खेड : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे.
त्यामुळं तेथील प्रशासन सतर्क झालं असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.










