मॉडेल मेकिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक
सावंतवाडी : नॅशनल स्टीम ( मिनी सायन्स)चॅलेंज २०२२- २०२३ पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत मॉडेल मेकिंग यात मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव च्या कु. नारायण विद्याधर मांजरेकर या विद्यार्थ्याचा राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे.
या स्पर्धेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेतील लिपिक गोविंद कानसे यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ संस्था सदस्य श्री. केळुसकर तसेच शाळा कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कायदेविषयक सल्लागार अँड. विरेश राऊळ, तसेच शिक्षण सल्लागार वैजनाथ देवण, शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.
Sindhudurg












