कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे आम.नितेश राणेंच्या हस्ते झाले उद्घाटन 

वाचनालयाच्या उर्वरीत इमारतीसाठी १० लाखाचा निधी देणार; आमदार नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी)कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार श्री नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी वाचनालयाच्या उर्वरीत इमारतीसाठी १० लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले.तर वाचनालयाच्या एकूणच कामाचे आमदार नितेश राणेंनी कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, ज्येष्ठ कवी,अशोक बागवे, नाटककार प्रदीप ढवळ, माजी अध्यक्ष जि. प.सौ संजना सावंत, सांगावे सरपंच संजय सावंत, आणि पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच उपास्थित होते.यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित निबंध, हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी व शिक्षण प्रेमी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी वाचनालयाला भेट देत शूभेच्छा दिल्या.

या वाचनालयाच्या इमारतीसाठी आमदार श्री निरंजन डावखरे यांनी आपल्या फंडातून १० लाख व आमदार श्री नीतेश राणे यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ स्वखर्चाने ३ लाखाचे फर्निचर आणि अंतर्गत सुशोभीकरण करुन दिले आहे. त्याबद्दल दोन्ही आमदारांचा वाचनालयाच्या संचालक मंडला कडून शाल श्रीफळ ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष मोहन सावंत यांनी केले तर वाचनालयाचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मनोगतात लवकरच वाचनालय मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असून ई वाचनालया मार्फत मुलांना अद्ययावत माहिती पुरविण्यात येईल असे जाहीर केले.