देवगड तालुक्यातील दोनही पाणी योजना सुरू होणार, आ. नितेश राणे यांनी काढला समस्येवर तोडगा

गणेश चतुर्थी सणानिमित्त चाकरमानी गावी येणार आहेत यापूर्वीच विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजना व शिरगाव पाडाघर नळ योजना या दोन्ही योजना तातडीने चालू करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी यंत्रणांना दिले आहेत त्याचबरोबर थकित ग्रामपंचायतीने तातडीने थकीत असलेली पाणी पट्टी भरावी असे आदेशही त्यांनी दिले आहेत

आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते देवगड प्रादेशिक नळ योजना व विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजना या दोन्ही योजना जिल्हा परिषदेने बंद केल्या या योजना तातडीने सुरू कराव्यात यासाठी ही समन्वयाची बैठक लावण्यात आली होती या बैठकीला ग्रामीण पुरवठा विभागाचे अधिकारी महाजन विद्युत महामंडळाचे अधिकारी मोहिते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते तसेच लाभार्थी ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच ग्रामसेवक या बैठकीला उपस्थित होते भाजपा पदाधिकारी अमोल तेली अरीफ बगदादी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर माजी सभापती रवी पाळेकर या बैठकीला उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी पाणीपट्टी तातडीने जमा करा थकीत पाणीपट्टी भरली नाहीत तर चालणार नाही अशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या

मात्र जिल्हा परिषदेने तातडीने पाणी योजनाही सुरू करावी जेणेकरून येणारा गणपतीचा सण पाणीटंचाईचा जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यामुळे तातडीने पाणीपुरवठा सुरू करणे गरजेचे आहे

पाणीपट्टी पुरेशी न भरल्याने या दोन्ही योजनांचा विद्युत पुरवठा कट करण्यात आला आहे हा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विद्युत महामंडळाने प्रयत्न करावेत असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले

आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन ही पाणी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे