सिंधुनगरी : प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा येथील सुरबा कृष्णा गावडे वय 96 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते माजी सैनिक होते व गावडे मामा या नावाने ही त्यांची ओळख होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी सत्यविजय गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मूळ गोळवण येथील मामा गावडे यांचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळख होती. तसेच त्यानी कुडाळ खेड देवगड तळेबाजार कसाल कट्टा या ठिकाणी शासकीय गुरांचा दवाखाना सांभाळला होता.












