वेंगुर्ले : प्रतिनिधी l भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री. प्रथमेश राजन तेली यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
माजी आमदार राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश तेली हे आता समाजकारणा बरोबर राजकारणातही सक्रिय होत आहेत. त्यामुळे च त्यांची युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर झाली आहे. तसे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून प्राप्त झाले आहे.











