*एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मध्ये,’ कॉर्पोरेट एक्सपेकटेशन्स फ्रॉम एन्ट्री लेवल प्रोफेशनल ‘ या विषयावर कार्य शाळेचे आयोजन.*
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये दिनांक १४/०९/२०२३ रोजी ,*कॉर्पोरेट एक्सपेकटेशन्स फ्रॉम एन्ट्री लेवल प्रोफेशनल* या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला सिनिअर ट्रेनर म्हणून डॉ. के दीपा मॅडम व श्री आलोक दुबे ,IBS ICFAI बिझिनेस स्कूल ,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री. अभिराम देसाई IBS ICFAI बिझिनेस स्कूल (सिंधुदुर्ग हेड)हे गेली 6 वर्षांपासून एस एस पी एम इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणारे उपक्रम राबवत आहेत,तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ हून अधिक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग दिलेले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये नोकरी साठी लागणाऱ्या स्किल व त्यासाठी पूर्वतयारी कशी करायची याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या ट्रेनिंग चा फायदा महाविद्यालयातील कॉम्पुटर,इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि AIML शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना झाला.
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २२ वर्षांपासून संस्थापक सन्मा. नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सन्मा. निलमताई राणे, ऊपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.
सदर कार्यशाळेसाठी कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. एम. के. साटम ,प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे,सर्व विभाग प्रमुख व महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












