महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थी मेळाव्यात अनेक विद्यार्थी मनसेत दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात अनेक नवोदित विद्यार्थ्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदीप दळवी व मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे यांनी त्यांचे स्वागत करीत मार्गदर्शन केले.

यावेळी मान्यवरांकडून विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे माजी युनिट अध्यक्ष कु.साहील तळकटकर व दिपाली राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी चे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी सेनेचे सचिन पाटणकर,प्रतीक मालवणकर,अमोल नाईक,रसिका पालव,प्रणाली परब,संध्या पाताडे,सोनाली सावंत,शमिका सावंत,सेजल कुंभार,ओमकार नवार,भगवान राऊळ,गौरव राऊळ,यश नाईक आदी उपस्थित होते.