पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्या शुभारंभ

 

प्रहार भवन कणकवली येथे विशेष कार्यक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्रांचा होणार दिल्लीत गौरव

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा आज शुभारंभ होत असून रविवारी सकाळी १०:३०वाजता प्रहार भवन कणकवली येथे विश्वकर्मा योजना शुभारंभाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.देशातील बारा बलुतेदारांना सक्षम करण्यासाठी सन्मान करण्यासाठी ‘पी एम विश्वकर्मा योजना’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेली होती.याचा शुभारंभ मध्यम सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकार मार्फत कार्यान्वित होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या नेतृत्वाखाली पी एम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्रांचा यशोचित गौरव पंतप्रधान यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
कणकवली प्रहार भवन येथील कार्यक्रमाला आ.नितेश राणे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. तरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी ,मंडळ अध्यक्ष , सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.