देवगड l प्रतिनिधी : मिठबाव येथील प्रसाद लोके याचा दोन दिवसांपूर्वीच मुणगे मशवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला.त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद लोके याची पत्नी सौ. मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके यांनी (३०) गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल होत रीतसर पंचनामा करून मृतदेह शववच्छेदनासाठी देवगड येथे नेण्यात आला.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. मनवा ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती.पहाटे तिच्या आईला
जाग आली तेव्हा मनवा तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वाना उठविले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेस वर शेडच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. पतीच्या निर्घृण हत्येनंतर आता पत्नीने ही दोन दिवसांनी आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे .











