रखडलेल्या आंबेत पुलावर केलेली ही मार्मिक कविता
आंबेतच्या ह्या पुलावरून पुन्हा गाडी कधी धावणार, गाडी कधी धावणार,
आमची परवड कधी थांबणार lधृl
महाड मंडणगड अस हे वळण लय मोठं,
पन्नास किलो मीटरचं अंतर हाय थेट,
त्रास देऊन भोळ्या जनतेला पाप कुठे भरणार,
सांगा गाडी कधी धावणार l१l
आमदार खासदार निवडून आलेत बसलेत खुशाल,
मतदार राजा झालाय बेहाल, चौहू बाजूनं कंगाल,
पाच वर्षे होऊन गेली अजून गप्प किती बसणार,
आमची परवड कधी थांबणार l२l
साबा खाते अजून म्हणते वेळ कामाला लागेल
काय भरवसा सरकार वरती दिल्या वचनाला जागेल
एक जुटीनं वज्र मुठीनं आता आम्ही लढणार,
आता आम्ही लढणार,
आमची परवड कधी थांबणार l३l
साधी भोळी आमची ही माणसं आहेत कोकणची,
जर का चिडली आणि भिडली तर मग भुमिका टोकाची,
रविंद्र म्हणतो आंबेतच्या पुलाचं राजकारण किती करणार,
सांगा गाडी कधी धावणार l४l
कवि : रविंद्र लोखंडे.
संपर्क (मोबाईल): ९८६७१७६७७१.












