रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ धरणाची जॅकवेल कोसळल्यानंतर शहरात पाण्याच्या नावाने हकाकर उडाला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये कोसळलेल्या या संकटानंतर भाजपा पदाधिकारी दादा ढेकणे आणि बाबू सुर्वे यांनी शीळ धरण येथे सुरू असलेल्या जॅकवेलच्या कामाची पहाणी केली. यावेळी त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी तूषार बाबर, पाणी विभागाचे अधिकारी भोईर यांची भेट घेतली.
ऐन गणपती उत्सव सुरू असताना रत्नागिरी शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या शीळ धरण येथील जॅकवेल कोसळली असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला,अनेक ठिकाणी 3 ते 4 दिवस नागरिकांना पाणी मिळाले नाही,अश्या वेळी नागरिकांचा वाढता उद्रेक पहाता नगरपालिका प्रशासनाकडून नविन जॅकवेलची जोडणी करण्याचे काम अतिशय युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
सदर काम प्रत्यक्ष पाहून कामाच्या गतीची माहिती घेण्यासाठी भाजपा शहर पदाधिकारी दादा ढेकणे आणि बाबू सुर्वेयांनी कामाच्या साईटवर जाऊन नगरपालिका मुख्याधिकारी तुषार बाबर व पाणी विभागाचे अधिकारी भोईर हे स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून काम करून घेत आहेत.याची पहाणी केली.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा लवकरच पूर्वरत होईल असे कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांच्या कडून सांगण्यात आले.












