आ. नितेश राणे सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनाला

सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले आमदार नितेश राणे यांनी

सेवा सप्ताह निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना आमदार नितेश राणे यांनी दिले प्रमाणपत्र

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे दर्शन भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी घेतले यावेळी त्यांना सिंधुदुर्ग राजाचा प्रसाद भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी दिला.

कुडाळ भाजप कार्यालय येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिंधुदुर्ग राज्याचे दर्शन आमदार नितेश राणे यांनी घेतले.

यावेळी प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, पप्प्या तवटे, नगरसेवक ॲड राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश नेमळेकर, चंदन कांबळी आदी उपस्थित होते.

तसेच आमदार नितेश राणे यांनी यावेळी सेवा सप्ताह निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप केले.

फोटो:- सिंधुदुर्ग राजाचे दर्शन आमदार नितेश राणे यांनी घेतले त्यांना प्रसाद देताना रणजित देसाई आदी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी

फोटो:- सेवा सप्ताह निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्या प्रमाणपत्र वाटप करताना आमदार नितेश राणे