आ. नितेश राणे यांनी काढला तोडगा, देवगड ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे

एका अधिपरिचारिकेची तातडीने प्रतिनियुक्ती, आदेश निघाला 

डॉक्टर रघुनाथ जोशी ही पूर्ववत सेवा देणार

देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने तीन ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाची नोटीस त्यांनी दिली होती मात्र आमदार नितेश राणे यांनी तातडीने सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करून रिक्त असलेल्या जागी नेमणुका देण्याचे आश्वासन दिले आहे तातडीने एका अधीपरिचारिकेची नेमणूकही देवगड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी  पूर्वीप्रमाणेच सेवा देणार आहेत

उर्वरित स्टाफ तातडीने भरत असल्याने आता अधिपरिचारिका चे आंदोलन मागे घेण्यात आले आहे
आमदार नितेश राणे यांनी प्रहार डिजिटल च्या बातमीची दाखल घेऊन तातडीने हालचाल केली जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य यंत्रणांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढला आहे व देवगड ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक असलेला स्टाफ देण्याच्या सूचना करण्यात आले आहेत लवकरच देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अन्य समस्या सोडवण्यासाठी आपण लक्ष घालत आहोत असेही त्यांनी सांगितले

आरोग्याला प्रथम प्राधान्य असून कोणत्याही परिस्थितीमध्ये देवगड मधील जनतेला आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही यासाठी ज्यांच्याशी आवश्यक चर्चा आहे त्यांच्याशी केली जाईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे