दशावतार लोककला महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

Google search engine
Google search engine

कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुरचा ‘कर्ण पिशाच्च व खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘पालीचा बल्लाळेश्वर’ प्रयोगांना तुफान गर्दी

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित राजवाडा सावंतवाडी येथे चालु असलेला दशावतार लोककला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘कर्ण पिशाच्च एक अर्धसत्य’ व खानोलकर दशावतार मंडळाचा ‘ पालीचा बल्लाळेश्वर ‘ या दोन्ही प्रयोगाना सावंतवाडीतील कला रसिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.

या नाट्यप्रयोगाला राजसाहेब खेमसावंत भोंसले ,राणीसाहेब शुभदा देवी खेमसावंत भोंसले, युवराज लखम सावंत भोंसले , श्रद्धाराजे भोंसले, उद्योजक अजय दोडीया व सौ .जयश्री दोडीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , सावंतवाडी परिसरातील कला रसीक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.