मंडणगड l प्रतिनिधी : दि .2 ऑक्टोबर 2023 रोजी पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे येथे लाल बहादुर शास्त्री जयंती व गांधी जयंती साजरी करण्यात आली. .प्रथमतः सर्वांचे शाब्दिक स्वागत विभाग प्रमुख श्री . इंगळे आर.व्ही. यांनी केले.सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी , विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
त्या नंतर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.सूर्यवंशी सर यांनी लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचा समारोप विभाग प्रमुख श्री.इंगळे सर यांनी सर्वांचे आभार मानून केला.या कार्यक्रमाला वाकचौरे सर, लिपिक पालकर भाऊ, शिपाई हीलम भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.अशा प्रकारे अतिशय उत्साहात लाल बहादुर शास्त्री जयंती व महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली ..










