पडेल येथील रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद; भाजप सेवा पंधरावडा अंतर्गत केले होते आयोजन

देवगड (प्रतिनिधी)      देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून कणकवली मतदारसंघात साजरा केला जात आहे. या सेवा पंधरावड्याचे औचित्य साधून कणकवली विधानसभा मतदारसंघात आज भाजप पडेल विभाग भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन पडेल येथे करण्यात आले होते.पडेल पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा या रक्तदान शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा पदाधिकारी आरिफ बगदादी, अमोल तेली संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, अमित साटम, रामकृष्ण जुवाटकर , अंकुश ठुकरुल, हरकुळ सरपंच, युवा सरचिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.