रत्नागिरी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच निवडणूका जवळ येऊ लागल्याने आरोप प्रत्यरोपांना धार चढली आहे. माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांनी आ. भास्कर जाधवांवर जोरदार टीका केली आहे.
मागील 40 वर्ष कोकणात तसेच गुहागरमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर निलंबन करण्याची कारवाई भास्कर जाधव यांनी सुरु केली आहे. चोरीचे जर बोलत असतील तर तुमच्या नेत्यांनी कोविड काळात महानगर पालिकेत जे मृत पेशंटसाठी साडे सहाशे रुपयाची बॅग 6 हजार रुपयापर्यंत विकत घेतलेली आहे. असे तुमचे चोर नेते असताना तुम्ही त्यांना काय म्हणाल ते अगोदर सांगा, असा सवाल केला आहे.
ज्यावेळी तुम्ही गोळीबार मैदानात सभा घेतलात तेव्हा, ते चोर नव्हते का? शिवसेनेतून गेल्यावर असे आरोप करायचे घाणेरडे राजकारण थांबवावे. भास्कर जाधव हे कोकणच्या राजकारणातील कलंक आहेत. भास्कर जाधव यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका योगेश कदम यांनी केली आहे.












