कळणे घाटीत स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कलंडला

मणेरीतही कंटेनर पलटी

दोडामार्ग l प्रविण परब :   मुंबईहून गोव्याकडे स्पिरीट वाहतूक करणारा कंटेनर कळणे घाटीत कलंडला. गिअर लॉक झाल्याने हँड ब्रेक ओढून कंटेनरच्या चाकाखाली दगड टाकून उभी करण्याचा चालकाचा प्रयत्न फसला व कंटेनर गटारात कलंडला. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बांबोळीत हपविण्यात आले आहे. तसेच मणेरी बाजारवाडी नजीकच्या वळणावर गोव्यातून कोल्हापूर कडे मँगनीज वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

दोडामार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, कर्मचारी विजय जाधव, आनंद नाईक, पलक गवस आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.