उस्मानाबाद इथल्या जिल्हा न्यायालयाचं सर्व कामकाज, ई प्रणाली द्वारे करण्याच्या मोहिमेचा, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला. यावेळी पेडणेकर यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील, ई-फायलिंग, ई-पेमेंट, इ कोर्ट सर्विसेस मोबाईल ॲप, ई-पेमेंट आणि ई लायब्ररी या विभागांचंसुद्धा उद्घाटन झालं. ई संगणकीय प्रणालीमुळे न्यायालयाच्या कामात गतिमानता तसंच पारदर्शकता येऊन पक्षकारांचा, न्यायालयाचा आणि वकिलांचा वेळ वाचेल असं मत पेडणेकर यांनी व्यक्त केलं. —-सिंक—अरुण पेडणेकर ,औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील न्यायालयं ई प्रणालीवर कार्य करत असून जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील ५०० वकिलांनी, ई प्रणालीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती, प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दिली.सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, उस्मानाबाद हे जिल्ह्यातील संगणक प्रणाली द्वारे चालणारं पहिलं न्यायालय असल्याचं, तसंच लवकरच उस्मानाबाद सह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचं कामकाज कागदविरहित सुरु होईल अशी माहिती, शेंडे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अँडव्होकेट मिलिंद पाटील उपस्थित होते.