लांजा (प्रतिनिधी) मिशन आपुलकी अंतर्गत जि.प.शाळा आंजणारी मराठी या शाळेला गावचे माजी सरपंच रविकांत शिखरे यांनी कपाट भेट दिले.माजी सरपंच रविकांत शिखरे यांनी आपल्या मुलाच्या आनंद शिखरे याच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ही भेट दिली. तसेच जैनुद्दीन ठोंगे यांनी शाळेला दोन ट्युबलाईट सेट दिले. तसेच नांदिवली व आंजणारी अंगणवाडी साठी गॅस कनेक्शन शेगडीसहित आज भेट दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी रविकांत शिखरे सपत्नीक तसेच वेरवलीचे गावाचे उद्योजक रविंद्र डोळस,पुनसचे सरपंच संतोष लिंगायत, ठेकेदार अमित बंंडबे , गावाच्या माजी सरपंच सौ.संध्या तांबे,पोलीस पाटील सौ.सरपोतदार ,आंजणारी गावचे सरपंच प्रविण शिखरे ,ग्रामसेवक गमरे , शाळेचे मुख्याध्यापक सुधीर रसाळ, शिक्षक महेंद्र शिंदे , बाबा माने हे उपस्थित होते.












