भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन, नवीन इमारतीचे कोनशीला समारंभ

रविवारी 8 ऑक्टोबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन व या न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशीला समारंभ सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे न्यायमुर्ती श्री. भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री. माधव जामदार यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमुर्ती श्री. देवेंद्रकूमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. विनायक जोशी या मान्यवर प्रमुख अतिथींचे उपस्थितीतीत 8 ऑक्टोबर 2023 सकाळी 10:40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल मंडणगड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय मंडणगड अँड. मिलींद लोखंडे अध्यक्ष वकील संघ मंडणगड यांच्यावतीने करण्यात आले आहे.