मिठबाव डगरेवाडी येथील तरुण बेपत्ता

देवगड | प्रतिनिधी
तालुक्यातील मिठबाव डगरेवाडी येथील जानोजी गोपीनाथ गावकर (३५)हे ६ ऑक्टोबर स.६.३० वा. घरात कुणालाही न सांगता निघून गेले असून अद्याप घरी आले नाहीत अशी फिर्याद रुक्मिणी गोपीनाथ गावकर (६०) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून ते नापत्ता झाल्याची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार विजय बिर्जे करीत आहेत.