सावंतवाडी । प्रतिनिधी : कॅथॉलिक पतसंस्था, सैनिक पतसंस्था तसेच सैनिक स्कूलसारख्या संस्थाचे संस्थापक सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे शनिवारी निधन झाले. सैन्य दलातील निवृत्तीनंतर त्यांनी सहकार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व पत्रकारीता क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली होती. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या
स्मृतींना उजाळा मिळावा तसेच त्यांच्याप्रती श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेस उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन पी.एफ. डॉन्टस मित्रमंडळ, हितचिंतक, सर्व संस्था पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.











