शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत- दीपक केसरकर

deepak kesarkar on sanjay raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे, शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळेच त्यांना राज्य सरकार कोसळणार असल्याची स्वप्नं पडतात, पण याविषयी त्यांनी वर्तवलेलं भविष्य कधीच खरं ठरणारं नाही, असं राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते. शिवसेना संपवणं हाच शरद पवार यांचा प्रयत्न आहे, त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत, महाविकास आघाडीत शिवसेनेच्या घसरलेल्या स्थानावरूनही हेच सिद्ध होतं अशी टीकाही केसरकर यांनी केली. ही परिस्थिती कट्टर शिवसैनिकांच्या लक्षात येईल, त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात ठामपणे उभे राहतील असं मतही केसरकर यांनी व्यक्त केलं.