दोडामार्ग तहसीलदार संकेत यमगर यांचे कडून स्वागत
दोडामार्ग | सुहास देसाई : स्वातंत्र्याच्या आझादीच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्राआज दोडामार्ग पंचायत समिती वतीने कार्यालय पासून दोडामार्ग बाजारपेठेतून निघाली व यामध्ये विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला यामध्ये दोडामार्ग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एम सी सी परेड करत कलाशाला सलामी दिली यावेळी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय समोर रॅली येताच तहसीलदार संकेत यमगर यांनी स्वागत केले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत सहायक गटविकास अधिकारी निलेश जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेद्र म्हापसेकर गटशिक्षण अधिकारी नदाप नेहरू युवा लोकसेवा केंद्र अध्यक्ष सुहास देसाई, चदु मळीक शंकर देसाई नेहरू युवा केंद्राचे प्रतिनीधी मनीष सावंत, विराज वेटे तसेच सरपंच अजित देसाई झोळबे सरपंच गवस ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते
तालुक्यातील विविध गावातील माती ग्रामपंचायत नुसार गोळा करून तालुका पंचायती कडे अमृत कलश यात्रेतून गोळा केली ती माती व अमृत कलशयात्रे तून तहसीलदार यांनी पचांयत समिती च्या वतीने नेहरू युवा केंद्राचे प्रतिनीधी मनीष सावंत व विराज वेटे यांचेकडे सुपूर्त केली त्या प्रतिनीधी मार्फत जिल्हा व राज्य सरकारच्या वतीने स्वागत करण्यात आल्यानंतर दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे यांचे प्रतिनिधित्व युवा केंद्राचे निवड झालेले दोन युवक मनीष सावंत व विराज वेटे हे दोडामार्ग तालुक्याच्या वतीने दिल्लीत पाठविले जाणार आहे
राज्यस्तरीय कार्यक्राअंतर्गत मुख्यमंत्रीसह मंत्री महोदय यांचे उपस्थिती अगस्त क्रांती मैदान मुबई येथे कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनंतर दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे उपस्थितीत कर्तव्यपथ कार्यक्रम आयोजित केला आहे या कामी जिल्हाभरातून नेहरू युवा केंद्राचे व अन्य युवा प्रतिनीधी व अधिकारी मिळून सोळा जण या अमृत कलश यात्रेत सहभागी होणार आहेत आज सकाळी दोडामार्ग गटविकास अधिकारी यांच्या उपस्थित मध्ये भव्य दिव्य रॅली काढून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांचे उपास्थित कलश देणेत आला.
दिल्ली येथे या मातीचा वापर शूरवीराच्या स्मरणार्थ अमृतवाटीकेची निर्मिती केली जाणार आहे त्यासाठी ही तालुक्यातील अनेक भागातून आलेली कलश यात्रेतील माती वापरली जाणार आहे.सदर कार्यक्रम साठी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत,विस्तार अधिकारीगटविकास अधिकारी अजिंक्य सावंत सहायक गटविकास अधिकारी निलेश जाधव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेद्र म्हापसेकर गटशिक्षण अधिकारी नदाप नेहरू युवा लोकसेवा केंद्र अध्यक्ष सुहास देसाई, चदु मळीक शंकर देसाई नेहरू युवा केंद्राचे प्रतिनीधी मनीष सावंत, विराज वेटे तसेच सरपंच अजित देसाई झोळबे सरपंच गवस माध्यमिक शिक्षक बामणीकर ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलश युवा केंद्राचे प्रतिनीधी कडे सुपूर्त करण्यात आला












