निवोशी भेलेवाडीतील विद्युत पोल जीर्णवस्थेत असून ते त्वरित बदलण्यात यावेत,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांचे उपकार्यकारी अभियंता, महावितरण गुहागर उपविभाग यांना निवेदन

पाटपन्हाळे (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील निवोशी भेलेवाडी क्षेत्रातील एकूण ६ विद्युत पोल जीर्णवस्थेत आहेत, सदर लाईनवरील २ विद्युत खांब सद्यस्थितीत पडण्याच्या स्थितीत असल्याने जीवितहाणी होण्याचा धोका संभवत असून महावितरण कंपनीने सदरचे काम त्वरित बदलावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार उपकार्यकारी अधिकारी,महावितरण उपविभाग, गुहागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, निवोशी भेलेवाडी गावातील धुमकवाडी वस्तीत विद्युत खांब तसेच दणदणेवाडी येथील घाणेकर यांच्या घराजवळील २ विद्युत खांब असे अनेक ठिकाणी एकूण ६ विद्युत खांब जीर्णवस्थेत असल्याचे दिसुन येत आहेत.निवोशी गावातील काही विद्युत खांब जमिनीलगत गंजलेले अवस्थेत आहेत ते खांब धोकादायक स्थितीत असून केव्हाही कोसळून मोठया प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी होऊ शकते. या धोकादायक विदयुत खांब संदर्भात जीवितहानी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे, विद्युत खांब कोसळून एखादी दुर्घटना किंवा जीवित हानी झाल्यास फक्त आपणांस जबाबदार येईल याची नोंद घ्यावी व त्वरीत हे गंजलेले विद्युत खांब बदलुन दयावेत व येथील ग्रामस्थांना सहकार्य करावे अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे, येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही मनसेचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, कौंढर काळसूर ग्रामपंचायत सदस्य सचिन जोयशी, कौंढर काळसुर मनसे शाखाध्यक्ष सुनील मुकनाक तसेच मनसे सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.