संदीप जाधव यांना पितृशोक

 

 

देवगड- प्रतिनिधी :जामसंडे प्रबुद्धनगर येथील तुकाराम सावळाराम जाधव (८६) यांचे रविवारी सायंकाळी ५.३० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. जामसंडे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमा मिलिंद पवार हायस्कूलचे (इंग्लिश मीडियम स्कूल, देवगड) शिक्षकेतर कर्मचारी संदीप जाधव यांचे ते वडिल होत.