आग, आपत्ती निवारण बाबत मालवण तहसील कार्यालय येथे मार्गदर्शन

मालवण | प्रतिनिधी : जागतिक आपत्‍ती धोके निवारण दिन निमित्ताने मालवण तहसिलदार कार्यालय येथे तहसिलदार वर्षा झालटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सागरी पोलीस विभागाचे निरीक्षक सिंग यांचे मार्गदर्शनाखाली आपत्‍ती धोके निवारण प्रशिक्षण मार्गदर्शन उपस्थितांना देण्यात आले.

यावेळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, निवडणुक नायब तहसलिदार नागेश शिंदे, महसूल सहायक तहसिलदार कार्यालय मालवण उमेश काळे यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सदर नैसर्गिक आपत्‍ती प्रशिक्षणात नैसर्गिक आपत्‍ती, अचानक लागलेल्‍या आग यावर कोणत्‍या प्रकारचे फायर इक्‍सींगशन वापरावे व आग आटोक्‍यात आणावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.