सीताराम उर्फ दादा कुडतरकर चा वाढदिवसानिमित्त उपक्रम
वक्तृत्व स्पर्धेचेही केले आयोजन
कणकवली : सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल साठी माईक सेट व मशिन भेट देवून दिली. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयराव वळजूं व मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांच्याकडे भेट वस्तू सुपूर्त केली.आपल्या वाढदिवसा निमित्त श्री. कुडतरकर यांनी ही देणगी दिली आहे.
या निमित्ताने विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा ६५ वा वाढ दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.यावेळी कुडतरकर यांनी विद्यामंदिर प्रशालेत आपली आई कै. रमाबाई कुडतरकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्री जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली.यात शंभर विद्यार्थी सहभागी झाले.
या स्पर्धेत गट क्र . १ पहिली ते चौथी प्रथम क्रमांक कु वेदा यशवंत महाडिक . द्वितीय क्रमांक कु रुद्र मनोज सावंत तृतीय क्रमांक देवराज गणपत कडू उत्तेजनार्थ १ ) ओबेद तुषार कदम २ ) आरोही रमेश कदम
गटक्रमांक २पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक कर्तृत्वा विनायक हरकुळकर द्वितीय क्रमांक सारा विध्नेश गोखले तृतीय क्रमांक गौरेश मुकेश काडगे उत्तेजनार्थ १ ) मृणाल महेश पाटील२ ) गार्गी अविनाश सावंत
गट क्रमांक ३ (आठवी ते दहावी ) प्रथम क्रमांक विधी विरेंद्र चिंदरकर द्वितीय क्रमांक सिद्धी अर्जुन खेडेकर . तृतीय क्रमांक सिध्देश गणेश तांबे . उत्तेजनार्थ १ ) शरयू लक्ष्मण पोतदार २ ) स्वरा अभिजित मिरजकर .. या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच कुडतरकर कुटुंबिय व सौ रंजना कुडतरकर रोटरीचे अध्यक्ष रवी परब,सौ उमा परब
,मनोहर पालेकर ,अशोक करंबळेकर, राजेद्र पेडणेकर, नॅपचे अनंतराव उजगावकर, डॉ पावसकर, डॉ . विद्याधर तायशेटे, डॉ प्राजक्ता तेली, विरेंद्र नाचणे, भेहराम राठोड, श्रद्धा कदम, पूजा सावंत, संदेश तुळसूलकर , विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळा कणकवली . विद्यामंदिर इंग्लिश स्कूल . विद्यामंदिर प्राथमिक विभाग सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.सूचसंचालन शेळके जे . जे . यांनी केले आभार श्री वणवे सर यांनी मानले .











