वेंगुर्ले | प्रतिनिधी : अश्वमेध तुळस महोत्सवात उद्योजक दादासाहेब परुळकर यांच्या हस्ते कै. बाबली विष्णू परुळकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वेंगुर्ले शाळा नंबर 4 च्या शिक्षिका सौ लीना नाईक यांना शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तुळस येथील या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कै.बाबली विष्णू परुळकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक झिलु घाडी यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सव यंदा सलग ९ व्या वर्षी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
Home सिंधुदुर्ग वेंगुर्ले वेंगुर्ले शाळा नंबर 4 च्या शिक्षिका लीना नाईक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित