दिव्यांग खेळाडुच्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत रत्नागिरीच्या एसटी कर्मचारी जनार्दन पवार यांना कास्य

रत्नागिरी | प्रतिनिधी : ATTF महाराष्ट्र यांच्या वतीने दि.०६.०१.२०२३ ते दि.०७.०१.२०२३ रोजी झालेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे दिव्यांग खेळाडुच्या राष्ट्रीय स्पर्धे घेतल्या होत्या. त्या स्पर्धेत रा. प. महामंडळ रत्नागिरी विभागातील जनार्दन तुकाराम पवार या सफाईगार कर्मचाऱ्यांनी कास्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडु प्रशांत महेंद्र सावंत यांचे प्रशिक्षण लाभले.

तसेच, सदर स्पर्धेसाठी श्री पवार यांना रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक श्री प्रज्ञेश बोरसे व सर्व अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सर्वच अधिकारी / कर्मचारी वर्गा कडुन अभिनंदन होत आहे.