देवगड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नेञदीपक यश

शिरगाव (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध क्रिडा प्रकारात शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले
या प्रशालेतील १४ वर्षाखालील वयोगटात (मुलगे) थाळीफेक मध्ये कुणाल उघडा द्वितीय क्रमांक, २०० मीटर धावणे मध्ये पार्थ अनभवणे प्रथम क्रमांक पटकावला. मुलीं मध्ये थाळीफेक मध्ये अक्षरा ओटवकर प्रथम क्रमांक पटकावला, ४०० मीटर धावणे समीक्षा ठुकरुल प्रथम क्रमांक पटकावला.

१७ वर्षाखालील वयोगटात (मुलगे) संतोष बोडेकर याने गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व ३००० मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळविला.८०० मीटर धावणे स्मीत सावंत यांने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये सानिया पवार हिने उंचउडी व लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला .तसेच तिने ८०० मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.साक्षी चव्हाण हिने थाळीफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.तसेच तीने ८०० मिटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. १९ वर्षाखालील वयोगटात (मुलगे) हातोडाफेक मध्ये आदेश साटम यांने प्रथम क्रमांक पटकावला. ४०० मीटर धावणेमध्ये पवन अनभवणे यांने प्रथम क्रमांक पटकावला. संजीव बोडेकर याने गोळाफेक व थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळाविला. मुलींमध्ये सुहासिनी दहिबावकर हिने उंचउडी व लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व तसेच तिने ८०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आदिनाथप्रसाद गर्जे व कृष्णा कदम यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, प्राचार्य एस एन अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे,सर्व शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत