संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटरचे घवघवीत यश

सावंतवाडी : प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर अकाउटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डीटीपी या अभ्यासक्रमामध्ये प्रभावती कॉम्युटर एज्युकेशन
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्पुटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात रोहन सुनिल नाईक (८४%) जिल्हयात पहिला, द्वितीय भुषण जयंत बेकनाळकर (८३.७५%) व पायल सिताराम धुरी (८२.५०%) जिल्हयात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात सुदिप आनंद दळवी (८९.२५%) जिल्हयात पहिला, मयुरेश कृष्णा सुतार (८७.७५%) जिल्हयात दुसरा आणि धनश्री भिवा सांवत (८६. ५०%) जिल्हयात तिसरी आली.

सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात सन्मिता संदिप दाभोलकर (८६. ५०%) जिल्हयात पहिली, वेदांत संजय भाईप (८६%) जिल्हयात दुसरा, वियोला जेम्स फर्नाडिस (८४%) जिल्हयात तिसरी आली. या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधुन ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमघ्ये उतीर्ण झालेत.

यामध्ये श्रावणी राऊळ, सुमिता राऊळ, खुशी माळकर, अथर्व परब, वैष्णवी गावडे, अंकिता
परब, नम्रता राणे, पुनम नाटेकर, मोनिका फनडिस, समिक्षा धारगळकर, स्नेहा सांवत, मनाली कोलगांवकर, लावण्या कुबडे, श्रेया कासकर, संगीता कदम, जान्हवी अमरे, पंकज मल्हार, धनदा इब्रामपुरकर, आदित्य कोलेकर, सानिका गोसावी, उत्कर्ष पालव, बाबु दळवी, आर्या नाईक, पुर्वा चांदरकर, गोपाल वराडकर यांचा समावेश आहे. संस्था प्राचार्य संदीप देवळी यानी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन कैले. विद्यर्थ्यांना पल्लवी मेस्त्री व पुनम नाटेकर यांनी मार्गदर्शन केले.