मळेवाड येथे पार्क करून ठेवलेल्या टेम्पोला ‘आग ‘

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – मसुरकरवाडी येथील वराह पालन व्यावसायिक रणजीत त्रिवेणी सिंह यांच्या घरासमोर लावलेल्या बोलेरो पिकअप या गाडीला फॉरेस्ट चौकीसमोर अचानक आग लागून सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले.  हा अपघात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
त्यांनी आपली बोलेरो पिकअप शेजाऱ्याच्या अंगणात लावली होती. शॉर्ट सर्कीटने आग लागली असावी, असा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.