चिपळूण Breaking : बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भल्या पहाटे चिपळूणात

कोसळलेल्या पुलाची केली पाहणी

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन पुल सोमवारी भर दुपारी कोसळला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. वादात अडकलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अनेक विघ्न येतं असून हे काम अनेक वर्ष रेंगाळले आहे. या डिसेंबर पर्यंत महामार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील असतानाच महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील निर्माणधीन उड्डाण कोसळला.

यामुळे विरोधकांनी टिकेचे रान उठवले असताना राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी रात्री मुंबई सोडली आणि ते भल्या पहाटे चिपळूण येथे दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे भेट देवून मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन पुलाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी यावेळी माहिती दिली.